CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जामठी ता. बोदवड, जि.जळगाव ( विकास पाटील) : बोदवड तालुक्यातील जामठी येथील महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह बोदवड तालुक्यातील जामठी गावातून मुंबई,पुणे,सुरतयेथे कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या ७० च्या आसपास व्यक्ती नुकत्याच गावाकडे परत आल्या होत्या .त्यांची नोंद आरोग्य विभाग व ग्रामपंचायतने घेवून त्यांना घरातच राहण्याचा सल्ला येवती येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अजय सपकाळ यांनी तपासणी करून दिला.
जामठी येथील एका वृध्द महीलेला सर्दी, खोकला होऊन श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.म्हणून या महीलेला संशयित रूग्ण म्हणून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.दाखल केलेल्या ८ रूग्णाचे नमुणे तपासणी साठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते.जळगाव जिल्ह्यातील त्या ८ रूग्णापैकी जामठी येथील त्या महिलेचा त्यात समावेश होता. औरंगाबाद येथील प्राप्त झालेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक.डाॅ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. त्या नंतर बोदवड तालुक्यातील परीसरातूंन होणाऱ्या चर्चेला लगाम बसला व गावातील सर्व मंडळीनी सुटकेचा मोकळा श्वास घेतल्याची नागरिकात चर्चा आहे.