CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

१९ हजार लाचप्रकारणी फरारी पोलीस नाईक विलास सोनवणे एसीबीच्या जाळ्यात

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

जळगाव : धरणगाव येथे नेमणूकीस असलेला पोलीस नाईक विलास सोनवणे याने लाचेची मागणी केल्या प्रकरणी अ‍ॅंटीकरप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून तो फरार होता फिर्यादीस शिक्षा होणार नाही अशा पद्धतीने कादगपत्र तयार करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्याच्या मोबदल्यात १९ हजार रुपयांची सोनवणे याने लाच मागितली होती.

या प्रकरणी पोलीस नाईक विलास सोनवणे याच्या विरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला होता. पोलीस नाईक विलास सोनवणे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दि.८ मार्च २०२१ रोजी भाग ५ गु.र.न. ११९/२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ व भा.द.वि. ३९२, २०१, १८६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस नाईक विलास सोनवणे फरार होता. दि. २७ मे रोजी एसीबी जळगाव युनीट मधील धडाकेबाज पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांना सदर आरोपी जळगांव शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार हे.कॉ. दिनेशसिंग पाटील यांनी आपले कौशल्य वापरुन फरार पोलीस नाईक विलास सोनवणे यास शिताफीने आपल्या जाळ्यात ओढून ताब्यात घेत वरिष्ठां समक्ष हजर केले.पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यास आज जळगाव शहरातून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.