CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद बु।। ग्रामपंचायत धुमशान २०२१ युवाशक्ती पॅनल चा जाहीरनामा प्रसिद्ध

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

बेटावद बु।। ता.जामनेर (प्रतिनिधी) : बेटावद बु।। ग्रामपंचायत धुमशान २०२१ युवाशक्ती पॅनल चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून गावकऱ्यांसाठी ते खालील योजना राबवणार असल्याचे दिसत आहे.शासकीय योजना.1.नियमित ग्रामसभा घेऊन शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच ग्रामसभेत ठराव घेऊन विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवणे.2.घरकुल योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे.3.निराधार व वयोवृद्ध लोकांसाठी "पेन्शन योजना"4.शेततळे ,सिंचन विहीर, सुलभ शौचालय पुरवणे.5.दारिद्र्य रेषेखालील लोकांना "रेशनकार्ड" मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.6.सर्व कुटुंबांची माहिती घेऊन शासकीय नियमांप्रमाणे रेशन मिळण्यासाठी प्रयत्न करणे.

पाणीपुरवठा.1.पिण्याचे तसेच वापराचे पाणी नियमित पुरवणे2.R. O प्रणाली सुरू करून अल्प दरात कार्ड वाटप करून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवले जाईल.3.पाणीपुरवठा 12 महिने खंडित न होता होईल याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.

स्वच्छता- 1.शौचालयांचा प्रश्न सोडवून 100% हागणदारीमुक्त गाव करन्यासाठी प्रयत्न करणार.2.बाकी असलेल्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून स्वच्छ व सुंदर रस्ते बनवणार.3.गटारींचे बांधकाम करून सांडपाण्याचा प्रश्न सोडवणार.4.प्रत्येक चौकात कचराकुंड्या बसवणार.5.प्रत्येक चौकात बसण्यासाठी बाकडे बसविणार.

शिक्षण-1.जि. प. प्राथमिक शाळेसाठी शालेय तसेच क्रीडा साहित्य पुरविणार.2.जी प शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रयत्न करणार.3.गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कपडे तसेच पुस्तके पुरविणार.4.अंगणवाडी साठी इ-लर्निंग प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न करणार.5.विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे तज्ज्ञ मार्गदर्शकाना बोलावून आयोजन करणार.6.विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार.7.प्रस्थावीत अभ्यासिकेमध्ये फर्निचर करून पुस्तकांसाठी कपाट व स्पर्धा परीक्षेची तसेच सर्व शैक्षणिक पुस्तके पुरविणार.

दिवाबत्ती.1.प्रत्येक चौकात हायमास लॅम्प बसवणार.2.प्रत्येक इलेक्ट्रीक पोल वर लाईट बसवणार.3.प्रत्येक स्मशान भूमीत लाईट ची व्यवस्था करणार.

सामाजिक.1.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओट्याचे सुशोभीकरण करणार.2.समाज मंदिरामध्ये तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बसविणार.3.दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्तीचा विकास करणार.4.श्री क्षेत्र लिंगोबा महाराज मंदिर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार.5.स्मशान भूमीतील ओट्याचे काम करणार.6.शिवद्वार बांधण्यासाठी प्रयत्न करणार.7.व्यायाम शाळा दुरुस्ती करून नविन साहित्य पुरविणार.

युवाशक्ती चा एकच नारा सर्वाना समान न्याय ,भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत - असा जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला असून सुज्ञ नागरिक दोन्ही पॅनलचे जाहीरनामे वाचून समजून-उमजून मतदान करतील अशी चर्चा जनसामान्यात आहे