CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जामनेर : (क्राईम बॉर्डर ता. प्र.) दि. ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७ वा कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तब्बल एक तास बसेस अडवून ठेवल्या.बेटावद बुद्रुक गावातील अनेक विद्यार्थी बोदवड येथे शिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थी बोदवड ला बस ने ये-जा करतात.मात्र अनेक दिवसांपासून बेटावदला बस थांबत नसून बस ची संख्या सुद्धा कमी आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला सामोरं जावं लागत आहे.याविषयी विद्यार्थ्यांनी दि.२२ डिसेंबर २०२१ रोजी बोदवड एस टी आगाराला निवेदन दिले होते. मात्र आगाराकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी दि.०४ जानेवारी २०२१ ला सकाळी ७ वा रास्ता रोको आंदोलन करून बस अडवण्याचा प्रयत्न केला. गावचे पोलीस पाटील यांनी मध्यस्ती करून सदर आंदोलन मागे घेण्याची विंनती करीत विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.तात्काळ विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.
१९९५ साली बेटावद बुद्रुक शिवसेना शाखेचे तत्कालीन शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र वखरे यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला होता. आजच्या या रास्ता रोको आंदोलनाने गेल्या २५ वर्षांपूर्वी झालेल्या रस्ता रोको आंदोलनाची बेटावदकरांना आठवण झाली.त्यावेळी न. हा. रांका हायस्कुल व ज्युनि.कॉलेज चे तत्कालीन प्रा.किशोर पाठक व बोदवड चे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष बिहारीलाल अहुजा यांनी भाग घेतला होता.
मुक्ताईनगरचे आगारप्रमुख हे प्रवाशी संघटनेला व प्रवाशांना मदत न करता मनमानी कारभार करत असल्याचा बोदवड चे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष बिहारीलाल अहुजा यांची तक्रार असून लवकरच प्रवाशी संघटनेचे शिष्ट मंडळ जळगाव जिल्हा आगार प्रमुख यांची भेट घेणार आहे.