CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जळगाव : चाळीसगाव येथे ०२ जानेवारी २०२१ शनिवारी सकाळी १० वाजता हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक भडगाव रोड चाळीसगाव येथे शहीद हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येऊन त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र नाभिक विभागीय महामंडळाचे अध्यक्ष नानासाहेब एकनाथ परशुराम शिरसाठ,नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष रविंद्र उर्फ बंटी दादा नेरपगार, नाभिक कर्मचारी संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मनोहरजी खोंडे सर, संजयजी सोनवणे, राजेंद्र जी ठाकरे , श्रीखंडे साहेब,नाभिक महामंडळ महाराष्ट्र चे कार्य कारिणी सदस्य सुनील दादा बोरसे उपस्थित होते.
या प्रसंगी चाळीसगाव येथील दैनिक ग्रामस्थ चे संपादक व टाकळी प्रचा चे माजी सरपंच दादासो किसनरावजी जोर्वेकर,नानासाहेब शिरसाठ,बंटी दादा नेरपगार,मनोहरजी खोंडे सर यांनी आपले विचार व्यक्त केले व जोर्वेकर साहेबांनी नाभिक समाजाचे विकासासाठी व हुतात्मा स्मारकासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.
या वेळी नाभिक समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण, माजी उप नगर अध्यक्ष आप्पासाहेब विनायकराव वाघ,नगरसेवक नितीन पाटील,महेंद्र बाप्पू पाटील माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील,पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रमेश चौधरी, सदानंद भाऊ चौधरी,बाप्पू साहेब पवार गुरुजी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उप अध्यक्ष अल्लाउद्दीन भाई माजी नगरसेवक संजय घोडे यांनी माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाभिक समाजाचे सचिव व जिल्हा संपर्क प्रमुख किरण नेरपगार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र बहाळकर सर यांनी केले