CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
नाशिक : अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक(DySP) राजेंद्र ससाणे यांचा काल दुपारी एकच्या सुमारास नाशिक जवळील वडाळी भोई परिसरात कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. अमळनेर शहरासह तालुक्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे हे दोन दिवसापूर्वी रजा टाकून आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि नियमित आरोग्य तपासणी करिता नाशिक येथे जात होते.
गुरुवारी ते आपल्या कारने जात असताना वडाळी भोई जवळ त्यांच्या कारला अपघात झाला.ते स्वतः कार चालवत होते. यात त्यांची कार सुमारे दीडशे फूट दरीत कोसळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
एक चांगला शिस्तप्रिय अधिकारी मित्र गमावला असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक डी.डी.गवारे (से.नि.) यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.