CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनजमेंट लोणावळा यांच्या वतीने रक्षाबंधन उत्सव धूमधामने साजरा

CRIME BORDER | 27 December | 01:17 PM

सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनजमेंटमध्ये अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी आणि सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस , लोणावळा यांच्या वतीने रक्षाबंधन उत्सव धूमधामने साजरा करण्यात आला.

लोणावळा - (श्रावणी कामत) -: सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनजमेंटमध्ये अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी आणि सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस , लोणावळा यांच्या वतीने रक्षाबंधन उत्सव धूमधामने साजरा करण्यात आला. या निमित्ताने, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि लोणावळा सिटी पोलीस स्टेशनवर रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

सणाच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांचे समर्पण मान्य करत सिहंगड कॉलेजच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी सिहंगड कॉलेजच्या प्रोफेसर भाग्यश्री दशमुखे, प्रोफेसर भाग्यश्री मोटे, प्रोफेसर कल्पना जाधव, सौ. सीमा गावडे आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

या विशेष प्रसंगी, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्यामुळे समाजात निर्माण होणार्या सुरक्षिततेची प्रशंसा केली. त्याचप्रमाणे, एकमेकांच्या सुरक्षेला महत्त्व देणारा हा सण एक सकारात्मक संदेश देऊन गेला.

या कार्यक्रमाने रक्षाबंधनाच्या पावन दिवशी एकत्र येऊन समाजातील सुरक्षा यंत्रणा व त्यात कार्यरत असलेल्या कर्मप्रति आदर व्यक्त करण्याची संधी मिळाली.