CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई.

CRIME BORDER | 27 December | 01:17 PM

कारवाईमध्ये रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्या व जुगार खेळणाऱ्या १० जणांविरोधात गुन्हा नोंद

लोणावळा (प्रतिनिधी श्रावणी कामत) :- लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व रहिवाशांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी दि. २६/०२/२०२४ रोजी त्यांचे डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता मौजे वेहेरगाव येथील संतोष बोत्रे यांचे मालकीचे पडीक मोकळ्या जागेवर एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटका अड्डा चालविणारा एजंट नामे १)सिध्दार्थ फकीरराव खरात, वय ४१ वर्ष व त्याठिकाणी कल्याण नावाचा मटका खेळणारे चार इसम नामे २)जगन्नाथ किसन मावकर, वय ४८ वर्ष, ३)सुनील यादव सूर्यवंशी,वय ४७ वर्ष ४)गोरख रघुनाथ मोहिते, वय ६० वर्ष ५) विनायक उर्फ विजय दशरथ देवकर, वय ५५ वर्ष असे एकूण पाच इसम ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यातून रोख रक्कम, मटक्याचे साहित्य, ऑटो रिक्षा असा एकूण 1,10,210 रू.(अक्षरी एक लाख दहा हजार दोनशे दहा) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नमूद मटका अड्डा चालविणाऱ्या एजंटकडे अधिक चौकशी केली असता इसम नामे १)चंद्रकांत हौजी देवकर, २)शंकर नाना बोरकर, ३)निलेश सहादु बोरकर, ४)संतोष नामदेव बोत्रे सर्व रा.वेहेरगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरबाबत पो.कॉ गणेश येळवंडे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये एकूण दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा सागर बनसोडे, पो.हवा अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.