CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

शिरूर येथील जि.प.शाळेत शैक्षणिक शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न - शाळेच्या मदतीसाठी यापुढेही आम्ही सदैव अग्रेसर राहू -सी.आर.डब्ल्यू.ए - सौं श्रावणी कामत

CRIME BORDER | 27 December | 01:17 PM

लोणावळा :- दि. १० जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वखारीचा मळा (वढू बुद्रुक), ता. शिरूर, जि. पुणे येथे क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौं .सीमा राजेंद्र वखरे ,व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौं. श्रावणी कामत यांच्या मार्गदर्शनाखाली

लोणावळा,युवा साहित्य प्रतिष्ठान लोणावळा /मुंबई, किटी ग्रुप - लोणावळा, अमृतलाल नगडा मुंबई,मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ,धनंजय कोद्रे (वकील) व लोकमतचे पत्रकार अमित टाकळकर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील इयत्ता १ ली ते ४ च्या सर्व मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये स्कूल बॅग,कंपास पेटी, टिफिन बॉक्स, पेन इ. गोष्टींचा समावेश होता. तसेच मुलांसाठी खाऊ म्हणून चिक्की, बिस्कीटचे पुडे, लाडू, चिवडा याचे वाटप करण्यात आले‌.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप ढोकले यांनी प्रास्ताविक करताना शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मान्यवरांना दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव शिवले यांनी भविष्यात आपली शाळा संपूर्णपणे डिजिटल करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने विविध कौशल्ये आत्मसात करावीत असे मत व्यक्त केले.

प्राथमिक शाळेतच खऱ्या अर्थाने संस्कारांची पायाभरणी होते, तसेच शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देतात असे मत लोकमतचे पत्रकार अमित टाकळकर यांनी व्यक्त केले.

भविष्यात शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी मदत लागल्यास शाळेच्या मदतीसाठी यापुढेही आम्ही सदैव अग्रेसर राहू असे - क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौं. श्रावणी कामत व ॲड. धनंजय कोद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना केले .

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अंकुश शिवले, चंद्रकांत शिवले, भाऊसाहेब शिवले, गोरख शिवले, नवनाथ शिवले इ. मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळवून देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप ढोकले यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेतील सहशिक्षक भाऊसाहेब ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.