CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

डोंबिवली येथील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात ,६५ विद्यार्थी व ६ शिक्षक या सुदैवाने बचावले.

CRIME BORDER | 27 December | 01:17 PM

लोणावळा : चित्रा कामत

डोंबिवली येथील च. रू. बामा म्हात्रे विद्यामंदीर, कोपर, डोंबिवली पश्चिम या शाळेची तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची सहल कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेली होती.विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला परतीचा प्रवास करत असताना बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. सु दैवाने बस लोखंडी रेलिंग व झाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला असून सुमारे ६५ विद्यार्थी आणि शिक्षक असे एकूण ७२ जण या अपघातातून बचावले आहेत. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक, बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

च. रू. बामा म्हात्रे विद्यामंदीर, कोपर, डोंबिवली पश्चिम या शाळेची ३ री ते ७ वीच्या विद्यार्थ्यांची सहल कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेली होती.बसमध्ये असलेले ६४ विद्यार्थी व ६ शिक्षक दर्शन आटोपून जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना शिंग्रोबा मंदीराच्या पाठीमागील घाटामध्ये बसचा ब्रेक फेल झाला.सदर बस दरीच्या दिशेने जात असताना लोखंडी रेलिंग आणि झाडाला धडकली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना रुग्णवाहिकेतून गगनगिरी आश्रमामध्ये सुखरूप नेण्यात आले.