CRIME BORDER | 27 December | 01:17 PM
प्रतिनिधी : श्रावणी कामत
भारत जोडो ५५ व्या नीट इंडिया २०२२ व होनेस्टी अवॉर्ड, महाराष्ट्र पुणे जिल्हा येथील लोणावळा ऑक्सि्लीयम कॉन्व्हेंट हायस्कूल ची १० वी ची विद्यार्थी नंदिका धनंजय कामत हिला देण्यात आले...
मुंबई : इंदौर येथे नुकताच ५५ वा नीट इंडिया २०२२ व होनेस्टी अवॉर्ड कार्यक्रम संपन्न राज्यभरातून ९ शाळेच्या विद्यार्थी ना होनेस्टी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी फादर वर्गिस, सौं एनी पवार, फादर जोकब, फादर आईसेस,IPS अनुराधा शंकर, श्रीमती नितु जोशी, डॉ. भरत छापरवलं, श्री नितीश बरोळे, सौं अंकिता बॅनर्जी, श्री आशिष त्रिवेदी, डॉ. लिमा धर, सौं मार्गरेट गोवरीनाथ, फादर जेम्स, बिन्सी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला फुटेर्डो, व शिक्षिका व पालक यांचा प्रेरणा दिल्यामुळे हे शक्य झालं असे कु.नंदिका कामत हिने सांगितले. कु.नंदिका ही क्राईम बॉर्डरच्या पत्रकार सौ. श्रावणी उर्फ चित्रा कामत यांची कन्या होय.