CRIME BORDER | 27 December | 01:17 PM
पुणे (विशेष प्रतिनिधी) : लोणावळा येथील क्राईम बॉर्डरच्या पत्रकार व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष यांना सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श मुंबई या वृत्तपत्रात कडून देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम हा मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन मुंबई येथे संपन्न झाला या ठिकाणी बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस व आंतरराष्ट्रीय व्याख्याते , डबेवाला पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक, डॉ.पवन अग्रवाल यांच्या हस्ते देण्यात आला.आदर्श मुंबई चे संपादक आणि आयोजक अशोक भोईर व डॉ. संजय भोईर संयोजक भालचंद्र पाटील व नवनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.