CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भाऊ झाला भावाचा वैरी , भावाने केला सख्या भावाचा खून ,खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

राजगुरूनगर (ऋतुजा टाकळकर) : खेड तालुक्यातील वाडा येथे सख्या भावाने सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजवून देण्यास नकार दिल्यामुळे हि घटना घडली आहे. या कारणावरून शंकर मारूती वाडेकर ( वय५५ ) यांचा राजेंद्र मारूती वाडेकर (वय ४५ ) रा. वाडा (ता खेड ) याने खून केला आहे. हि घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र वाडेकर याला पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीससुत्रा नुसार, खेड तालुक्यातील वाडा येथे वाडेकर कुंटुंब राहायला आहे. शंकर वाडेकर याने मासे बनवण्यासाठी वृद्ध आईला सांगितले होते. मात्र आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला. यांचा राग येऊन शंकर वाडेकर यांने आईस शिविगाळ व मारहाण केली.

शंकर वाडेकर यांचा सख्या भाऊ राजेंद्र वाडेकर याला हा प्रकार सहन न झाल्याने राग अनावर होऊन शंकर याला पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत शंकर वाडेकरचा जागीच मूत्यू झाला .

प्रथमदर्शनी हा खूनच वाटत आहे. शवविच्छेदन केल्यावरती नक्की काय प्रकार हे समजेल, असे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सतिश गुरव यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा पोलीसांनी केला असून राजेंद्र वाडेकर याला खेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास स. पो. निरि.भारत भोसले करत आहे.


मुख्य संपादक : राजेंद्र वखरे , पुणे विभागीय प्रमुख : नितिन सैद