CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

यड्रावमध्ये अनैतिक संबंधातून युवकाचा खून,संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

सागर बाणदार इचलकरंजीहून

इचलकरंजी शहरालगतच्या यड्राव येथे अनैतिक संबंधातून प्रशांत भिकाजी भोसले या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला.घटनेनंतर संशयित आरोपी अजित उर्फ पिंटू आदमाने हा स्वतःहून शहापूर पोलीस ठाण्यात हजर झाला.शहापूर पोलीसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली.या घटनेने यड्राव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पत्नीशी मित्राचे अनैतिक संबध असल्याचा त्याला दाट संशय अजितला होता त्या कारणावरून त्यांच्यात वादही झाले होते.मित्राने आपला विश्वासघात केला आहे म्हणून त्याला कायमचा धडा शिकवण्याचे त्याने ठरविलें होते व तो संधीची वाट पाहत होता .

व्हिओ-इचलकरंजी शहरालगतच्या यड्राव येथील बेघर वसाहत परिसरात प्रशांत भोसले व अजित उर्फ पिंटू आदमाने हे दोघे वास्तव्यास आहेत.तसेच हे दोघे मित्र होते.या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंधातून वाद सुरु होता.त्यामुळे एकमेकांवर खुन्नस ठेऊन होते.आणि याच वादातून अजित आदमाने याने प्रशांत भोसले याचा काटा काढण्याचे ठरवून काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अजित यांने धारदार शस्त्राने प्रशांत भोसले याच्या पोटात व छातीवर वार केले.

या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी झाला.त्याला नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी इचलकरंजी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्याचा मृतदेह आयजीएम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.दरम्यान हॉस्पिटल बाहेर नागरिकांनी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक बी.बी. महामुनी,शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी पाहणी करून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.दरम्यान,या घटनेनंतर संशयित आरोपी अजित ऊर्फ पिंटू आदमाने हा स्वतःहून शहापूर पोलीस ठाण्यात हजर झाला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून रात्री उशिरा अटक केल्याचे सांगितले.या घटनेने यड्राव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

CRIME BORDER : मुख्य संपादक : राजेंद्र वखरे ,पुणे विभागीय प्रमुख नितिन सैद