CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सावकाराने २७ वर्षाच्या तरुणास पेट्रोल टाकून जिवंत जाळले मन विषण्ण करणारी घटना

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

CRIME BORDER

राजगुरुनगरहून नितिन सैद

बाभूळगाव : विना परवाना सावकारी करणाऱ्याने पुन्हा एकाचा बळी घेतला.पहिल्या खुनाच्या गुन्ह्यातून जामिनवर आल्यावर मित्राच्या मदतीने निमगाव केतकी येथील एका २७ वर्षीय युवकाचे अपहरण करून व्यजाच्या पैशाच्या मोबदल्यात जमीन देत नाही या कारणाने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना इंदापुर हद्दीत घडली असून त्यामधे युवक ९५ टक्के भाजल्याने ३ दिवसांनी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.

नवनाथ राऊत ( वय ३२ वर्ष निमगाव केतकी ता. इंदापुर ) व सोमनाथ जळक( वय ३० रा. इंदापुर ) अशी अटक असलेल्यांची नावे आहेत.त्यांना न्यायालयाने २६ जून २०२१ पर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे. शिवराज उर्फ शिवराम कांतिलाल हेगड़े ( रा निमगाव केतकी ता. इंदापुर ) असे मयत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसात दिलेल्या तक्रारी नुसार दि. ७ जून २०२१ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास फिर्यादी हा यशराज पेट्रोल पंपावर गेला होता. तेथे वरील आरोपींनी फिर्यादिस बंदुकीचा धाक दाखऊन चारचाकी गाडीत बसऊन अपहरण केले.व तुझ्याकडे व्याजाचे अजुन पैसे बाकी आहेत असे सांगत १३ दिवस अज्ञातस्थळी स्थळी डांबून ठेवले.

दि. २० जून २०२१ रोज़ी अरोपींनी फिर्यादिस सायंकाळी ६ च्या सुमारास इंदापुर येथील फॉरेस्ट हद्दित नेऊन त्याच्यावर पेट्रोल टाकून आग लावली व तेथून पळून गेले.फिर्यादी जीव वाचवण्या साठी जोर जोराणे ओरडत मातीत लोळत होता. रस्त्याने जाणाऱ्यांनी त्यास मदत केली.व फिर्यादी ने नातेवाईकांस बोलावण्यास सांगितले . काही वेळाने नातलग आल्यावर त्यास तेथून इंदापुर उपजिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले. परंतु फिर्यादीस जास्त भाजल्या मुळे तेथून सोलापूर सिव्हील हॉस्पिटल येथे ऐडमिट करण्यात आले.उपचार चालू असताना फिर्यादिने पोलीसांना लेखी जबाब दिला .त्या नंतर उपचारा दरम्यान फिर्यादिचा मृत्यु झाला.पोलीसांनी लागलीच अरोपींना बेडया ठोकुन कलम भा. द . वि . ३०२ चा गुन्हा रजिस्ट्रर केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे करत आहेत.

CRIME BORDER मुख्य संपादक:राजेंद्र वखरे,