CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

होलेवाडीत झाली चोरी : ६४ हजारांचा ऐवज लंपास.

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

होलेवाडीत झाली चोरी : ६४ हजारांचा ऐवज लंपास.

पुणे क्राईम बॉर्डर टीम

राजगुरूनगर - होलेवाडी ( ता- खेड) येथे बंद घराची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत घरातील ६४ हजारांचा ऐवज लांबविण्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून याप्रकरणी योगेश लक्ष्मण टाव्हरे (रा.होलेवाडी ) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
होलेवाडीमध्ये बुधवारी रात्री टाव्हरे यांच्या जिन्याखलच्या बंद दरवाजा वरील जाळी कापून चोर यांनी घरात प्रवेश करून झोपेत असणारी कमल दत्तात्रय टाव्हरे यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपयांचे मंगळसूत्र व २४ हजार रुपयांचे सोन्याचे मणी असलेले डोरले , तसेच दत्तात्रय श्रीपती टाव्हरे यांचे पायजम्याच्या खिशातील रोख साडेआठ हजार रुपये असा एकूण ६४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे . अधिक तपास पोलिस निरीक्षक भारत भोसले करत आहे.