CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची विहीरीत उडी मारून आत्महत्या

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची विहीरीत उडी मारून आत्महत्या

पुणे क्राईम बॉर्डर टीम

नारायणगाव : घराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी शिवीगाळ, मारहाण , टोमणे मारून मानसिक त्रास दिल्याने जुन्नर तालुक्यामधील नारायणगाव खोडद रोडला राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अनिता संभाजी पडवळ (वय ४५ वर्षे ) असे जीव गमावलेल्या महिलेचे नाव असून नारायणगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गंगाधर दुशिंग, रुपाली राहुल दुशिंग, प्रविण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रविण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग (सर्व रा.अष्टविनायक रेसिडेन्सी शेजारी खोडद रोड नारायणगाव ता. जुन्नर जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विशाल संभाजी पडवळ याने फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याची आई अनिता हे नारायणगाव येथे खोडद रोडवर अष्टविनायक रेसिडेन्सी शेजारी राहतात त्यांच्या शेजारी दुशिंग आडनावाचे कुटुंब राहत असून फिर्यादीमध्ये नमूद नावे असणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादी विशालची आई अनिता हिस दि १८ ते २४ जुलै दरम्यान वेळोवेळी टोमणे मारणे, मारहाण, शिवीगाळ तसेच दमदाटी करून वेळोवेळी आई अनिता हीस मानसिक त्रास दिल्याने त्यांचा त्रास असह्य झाल्याने आई अनिता हीने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून कंटाळून घरांमध्ये कुणाला काही एक न सांगता घरातून निघून जाऊन पाटे खैरे मळा येथील एका विहिरी मध्ये उडी मारून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस दुशिंग कुटुंब जबाबदार असल्याच्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिंगे पाटील करीत आहेत.