CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
राजगुरूनगर(क्राईम बॉर्डर न्युज नेटवर्क): खेड तालुक्यातील चास येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी नराधमावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश वामन सपाट (वय ४४, रा.कमानची सपाटवाडी ता.खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चास येथे घडला. मुलीची आई घरात नसताना गणेश वामन सपाट हा घरात जाऊन पिडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार, आत्याच्यार करत असतं. असे तीन वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्यामुळे मुलीला त्रास होऊन गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. गणेश सपाट याला पोलीसांनी अटक केली असून ७ दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करत आहे.