CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
क्राईम बॉर्डर - न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर- दावडी (ता.खेड) येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने वडील दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करत असल्याच्या कारणावरुन वडीलाच्या डोक्यात लोखंडी घण घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.हि घटना दि.१० मंगळवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली.या घटनेमुळे दावडी परिसरात खळबळ उडाली आहे.संतोष वाघिरे (वय ४३ रा. कान्हुरकरमळा,दावडी )असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी अल्पवयीन मुलाला खेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दावडी गावच्या हद्दीत कान्हुरमळा येथे मयत संतोष वाघिरे यांचा म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय आहे.वडिल संजय वाघिरे हे रोज दाऊ पिऊन सोळख वर्षीय मुलाला शिवीगाळ मारहाण करून काम करायला लावत होते.दहा तारखेला संजय वाघिरे यांनी १६ वर्षीय मुलाला दिवसभर शिवीगाळ ,मारहाण करून उपाशी गोठयामध्ये झोपायला लावले. या कारणामुळे मुलाला राग आल्याने मुलाने गोठयातील लोखंडी घणाने वडील संतोष वाघिरे यांच्या डोक्यात घाव घालून हत्या केली.
मयत वाघिरे यांचा मोठा भाऊ आदिनाथ संतोश वाघिरे यांने भावाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी खेड पोलीस ठाण्याचे पो.निरी. सतीश गुरव, पो.उप.निरी.भारत भोसले,पो.हवा.सचिन गिलबिले यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करत आहे