CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
CRIME BORDER : पुणे ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी बाबाजी पवळे
पुणे- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केल्यानंतर ट्रक मधील वाळू खाली करून महसूल पथकास दमदाटी करून पळून गेलेल्या वाळू तस्कराला सात महिन्यानंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. ३१ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिरूर तहसिल कार्यालयातील महसुल खात्याचे अधिकारी व पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व चोरी यावर कारवाई करत असताना शिरूर तालुक्यातील कारेगाव हद्दीत फलके मळा येथे हायवा ट्रक नं.एम. एच १२ क्यु. डब्ल्यु. ९९९५ हा पुणे नगर रोडने पुणे बाजुकडे जात असताना पथकाने हायवा ट्रक थांबवून पाहणी केली असता, त्यामध्ये वाळु असल्याचे पथकाला आढळून आले होते.
चालकाकडे पावतीची महसुल खात्याचे पथकाने पावतीची मागणी केली असता, चालकाजवळ पावती मिळून आली नाही. महसुल खात्याच्या पथकाने चालकास ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन येथे घेण्यास सांगितला,महसूल खात्याचे पथक ट्रक रांजणगाव पोलीस स्टेशन च्या दिशेने घेवून जाताना आरोपी धीरज पाचर्णे हा त्याच्या कडील स्विफ्ट कार नं. (एम. एच १२ क्यु एम ००१२) मधून पाठीमागून आला व त्याने ट्रक थांबवून चालकास खाली उतरवून ट्रक मधील वाळू रोडच्या कडेला खाली केली.आणि महसुल खात्याच्या पथकाने शासकीय कामात अडथळा आणून त्यांना दमदाटी करून चालकास घेवून निघुन गेला.
घटनेनंतर ट्रक महसूल खात्याच्या पथकाने रांजणगाव पोलीस स्टेशन येथे आणून लावला.याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी धीरज जगन्नाथ पाचर्णे (वय ३० वर्षे रा. तर्डोबाचीवाडी, शिरूर ता. शिरूर) हा गुन्हा केल्यानंतर सुमारे सात महिन्यापासून फरार होता.सदरचा आरोपी हा शिरूर परीसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली होती.त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले .
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे सपोनि.सचिन काळे,जनार्दन शेळके,पो.ना अजित भुजबळ,पो.ना राजु मोमीण,पो.ना. मंगेश थिगळे यांनी केली आहे