CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
:CRIME BORDER :
पुणे विभागीय प्रमुख नितिन सैद
राजगुरुनगर शहरामधे दुचाकीस्वार चिमुकल्या मुलासह दुचाकीवरुन आज सकाळी जात असताना दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने गंभीर अपघात झाला.
राजगुरूनगर , जि .पुणे : शहरामध्धे मध्यवर्ती भागात दुचाकीस्वार चिमुकल्या मुलासह दुचाकीवरुन आज सकाळी जात असताना अचानक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने गंभीर अपघात झाला आहे.या अपघातात चिमुकल्या मुलासह दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असुन दोघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळच्या सुमारास संतोष शेवाळे हे आपला मुलगा यश याला दुचाकीवरुन घेऊन जात होते घरापासून काही अंतरावरच ही दुदैवी घटना घडली. या घटनेत दुचाकी चालक संतोष शेवाळे यांचे दोन्ही पाय फुटुन रक्तबंबाळ झाला तर मुलगा यश यांच्याही दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
आज सकाळच्या सुमारास वडील मुलासह आपल्या दुचाकीवरुन पाण्याचा जार आणण्यासाठी जात असताना अचानक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाला या अपघातात वडिलांचे दोन्ही पाय फुटले असुन मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. मात्र अशा पद्धतीने दुचाकीचा अचानक स्फोट झाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे. स्फोटानंतर गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी जखमी व्यक्ती व मुलाला नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.