CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आज टोकावडे येथे श्री कोटेश्वर आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:34 PM

आज टोकावडे येथे श्री कोटेश्वर आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन


डोंबिवली : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना फार कमी लोकांच्या मनामध्ये रुजते व पुढे हीच रुजलेली भावना रोपट्याचं रूप घेऊन वटवृक्षात कधी रूपांतरित होते हे त्यांनाही कळत नाही ,कारण ते फक्त कार्याने झपाटलेले असतात.


आपण गरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे ही भावना मोहिनीताई राक्षे यांच्या मनामध्ये अनेक वर्षापासून होती तसं पाहता त्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.पुणे जिल्ह्याच्या भाजपा महिला मोर्चाच्या सचिव म्हणून त्या काम करत असताना क्राईम बॉर्डर चे पुणे विभागाचे विभागीय संपादक तसेच पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी श्री.नितीन सैद यांनी त्यांचे कार्य बघून क्राईम  क्राईम बॉर्डरच्या खेड तालुका प्रतिनिधी पदावर नियुक्ती केली.

 

मोहिनी ताई राक्षे यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्य केले असून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या हरहुन्नरी मोहिनीताई राक्षे यांच्या अथक प्रयत्नातून आज दिनांक २६ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता स्वर्गीय राहुल दादा सावंत यांच्या स्मरणार्थ मु. पो. टोकावडे ,तालुका खेड येथील श्री कोटेश्वर आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न होत आहे.

 

या कार्यक्रमाला क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र वखरे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.विठ्ठल वनघरे , क्राईम बॉर्डर चे पुणे विभागीय संपादक तसेच पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी श्री.नितीन सैद, ज्येष्ठ पत्रकार श्री.रामचंद्र सोनवणे, क्राईम बॉर्डर चे जिल्हा प्रतिनिधी तसेच अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष श्री.किरण देवरे, दक्षिण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री .संजय बोंबले,ह-भ-प श्री.दत्तात्रय  मुर्हे,श्री.बाळू आसवले ,श्री.शंकर मुर्हे ,अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला शिंदे तर टोकावडे ग्रामपंचायतचे सरपंच श्री प्रकाश मुर्हे  , राजगुरुनगर समाचार चे संपादक श्री.बाळासाहेब सांडभोर, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश यादव, श्री. मच्छिंद्र पवळे , पालवी संस्थेच्या सुरेखाताई कड,  जिल्हा उपाध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या  आरती राक्षे सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी बोंबले ,श्री.ज्ञानेश्वर मुर्हे उपस्थित राहणार आहेत.

 

नुकताच मोहिनीताई राक्षे यांचा  क्राईम बॉर्डर च्या वृत्त संपादिका तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सीमा वखरे यांनी त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल डोंबिवली येथे सत्कार केला . श्री  कोटेश्वर आदिवासी वस्तीगृहाचे अध्यक्ष  बशीर भाई तांबोळी हे आदिवासी लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्षापासून कार्यरत  त्यांना नवीन वस्तीगृहाची गरज असल्याचे त्यांनी मोहिनीताई राक्षे यांना सांगितले होते.