CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
चाकण (crime border -ऋतुजा टाकळकर) : भामनेर खोऱ्यातील करंजविहिरे (ता-खेड) येथे प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा गंभीर घटना घडली असून आरोपींमध्ये मृतकाच्या पत्नीचा समावेश असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या दुहेरी हत्याकांडात प्रियकर आणि त्याच्या मित्राची हत्या झाली असून मुलीला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले ,चाकण औद्योगिक वस्तीमध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या बाळू सीताराम गावडे (वय २६वर्ष, रा.आसखेड खुर्द,ता-खेड,जि-पुणे) याने त्याचा मित्र राहूल दत्तात्रय गावडे (वय २६वर्ष, रा.आसखेड खुर्द,ता-खेड,जि, पुणे ) याच्या मदतीने हॉटेल मालकाच्या २१ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणातील राहुल गावडे आणि बाळू गावडे या दोघांचा शोध घेऊन त्यांना आपल्या हॉटेलवर बोलवून लोखंडी रॉड , लोकडी काठ्याने बेदम मारहाण केली, या प्रकरणात दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्रकला उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंद सीताराम जाधव, बाळू मरगन (हॉटेल मालक) यांना अटक करण्यात आहे.पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत करीत आहे.
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
पुणे विभागीय प्रमुख : नितीन सैद