CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
ऋतुजा टाकळकर
चाकण : ७५ वर्षीय सासऱ्याने ३५ वर्षीय सुनेवर लोखंडी सुरीने वार केल्याची गंभीर घटना खेड तालुक्यातील संतोषनगरला घडली आहे. सुनेवर हल्ला केल्यानंतर दुचाकीवर पळून गेलेला सासरा पुणे नाशिक महामार्गावर चाकण मध्ये रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत सापडला. सासरा आणि सुन या दोघांवरही चाकण मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांना घटनास्थळी लाकडी मुठीची लांब पात्याची सुरी मिळाली आहे.
राधिका मोरेश्वर येवले (वय -३५ वर्षे, रा. संतोषनगर) असे या हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे.या प्रकरणी हल्ला करणारा त्या महिलेचा सासरा पुरुषोत्तम दगडू येवले (वय-७५ वर्षे) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सून व सासरा यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते.सुनेला घरात राहू द्यायचे नाही, या कारणावरून तिला पुरुषोत्तम येवले हा सुनेला खूप त्रास देत होता . सकाळी जेव्हा राधिका घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती . त्यावेळी सासऱ्याने सुनेवर जीवघेणा हल्ला कारण्यासाठी तिचा पाठलाग करीत गच्चीवर गेला व तिच्या अंगावर लोखंडी सुरीने सपासप वार केले .या हल्ल्यात राधिका गंभीर जखमी झाली आहे . सासऱ्याच्या तावडीतून सुटून राधिका गच्चीवरून खाली आली . तिच्या पाठोपाठ तो धावत आला,आणि दुचाकी वरून पसार झाला.
आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी तातडीने गंभीर जखमी असलेल्या राधिकास चाकण येथे रुग्णवाहिकेतून नेण्यात आले मात्र पुणे नाशिक महामार्गावर रस्त्यात पुरुषोत्तम येवले देखील बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. सासरा आणि सून या दोघांनाही चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत .
CRIME BORDER मुख्य संपादक : राजेंद्र वखरे