CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
CRIME BORDER
पुणे विभागीय प्रमुख नितिन सैद
खेड:राजगुरुनगर नगरपरिषद गेल्या ६ महीन्यापासून शहरात रोज जमा होणारा ओला व सुका कचरा हा शहरातील पुणे नाशिक हायवे वरील पोलीस स्टेशन च्या मागे टाकत होती.तेथून तो ओला व सुका कचरा प्रक्रिये साठी उचलून नेल्या जात होता.
परंतु गेल्या ६ महिन्यां पासून पुणे नाशिक हायवे वरील पोलीस स्टेशन च्या मागे जमा होणार कचरा हा प्रकिया केंद्रावर जाणे बंद झाला आहे.सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्यामुळे तो रस्त्यावर येत असून त्याचा त्रास आस पास असणाऱ्या रहीवासी व पोलीस बांधवाना होऊ लागला आहे.या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसररली असून आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे .
नगरपरिषदेस वारंवार पत्रव्यवहार करून उपोषणाचे पत्र देऊन पण अधिकाऱ्यांनी त्यावर काही उपाययोजना केली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेने कचरा उचलून नगरपरिषदेच्या समोर टाकला व अधिकाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या याची दखल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी घेऊन १५ दिवसात कचरा उचलून नेण्याचे आश्वासन दिले.
या उत्स्फूर्त घनकचरा आंदोलनात राजगुरुनगरकर ग्रुप चे अमर टाटिया,कैलास दुधाळे,निलेषभाऊ आंधळे,राहुल पिंगळे, मिलिंद शिंदे व आपले मानवाधिकार फाउंडेशन चे नितिन सैद, नितेश पवार यांनी सहभाग घेतला .
CRIME BORDER
मुख्य संपादक:राजेंद्र वखरे