CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

लोणावळा मेडिकल असोसिएशन कडून एक लाखाच्या औषधांची मदत..

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

लोणावळा.सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्व शासकीय सुरक्षा यंत्रणा कामी लागल्या असून लोणावळ्यातील नागरिकांच्या सुरक्षे विषयी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्यावतीने शहरातील सर्व सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व मेडिकल व्यावसायिकांना प्रशासनाला मदत करण्या करीता आवाहन करण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने आज लोणावळा खंडाळा मेडिकल असो तर्फे लोणावळा नगरपरिषदेस अंदाजे एक लाख रुपयांची औषधे मुख्याधिकारी सचिन पवार , नगराध्यक्षा सुरेखा जाधव , उपनगराघ्यक्ष श्रीधर पुजारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर मेडिकल असोसिएशनने प्रशासनास केलेली ही मदत खूप मोलाची ठरणार आहे.ही औषधे सुपूर्द करतेवेळी लोणावळा मेडीकल असोसिएशन चे अध्यक्ष नंदकिशोर ( राजू) खंडेलवाल, रमेश परमार, खुशाल परमार, रवि परमार, कुमार परमार, आनंद परमार, अभय गवले, अभय भंडारी, मनोज गुप्ता, मनोज ओसवाल, उर्वेश पञावाला आणि सहकारी उपस्थित होते.