CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

खेड तालुक्यात शेतकऱ्यांचे उपोषण आंदोलन

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

राजगुरुनगर (ऋतुजा टाकळकर) : १२ गावच्या शेतकऱ्यांचे चक्री उपोषण आंदोलन सुरू; पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी खेड तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषण आंदोलन सुरू केले आहे. १२ गावांपैकी रोज एका गावातील किमान पाच शेतकरी पुढील चार दिवस रोज ज्ञानेश्वरी वाचन करणार आहेत.

तालुक्यातील १२ गावातून पुणे - नाशिक रेल्वे आणि रिंग रोड प्रकल्प होणार आहे. खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, आळंदी, च-होली, चिंबळी, केळगाव, मरकळ, धानोरे, सोळू, गोलेगाव या गावांचा समावेश आहे. रेल्वे मार्गासाठी ५० ते ८० मीटर आणि रिंग रोडसाठी सर्रासपणे ११० मीटर अशी एकूण ५८६ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. सर्व गावांतील शेतक-यांचा जमीन संपदनाला विरोध आहे.

अनेकजण भूमिहीन, अल्पभूधारक होणार आहेत. जमिनी संपादित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या आंदोलनात खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी, कल्पना गवारी, अनिता शेळके, आणि शेतकरी सहभागी झाले होते.