CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
राजगुरुनगर (ऋतुजा टाकळकर) : खेड तालुक्यात १२ गावच्या शेतकऱ्यांचे चक्री उपोषण आंदोलनाचे नवे रूप पाहायला मिळाले. शेतातून जाणाऱ्या रिंग रोडला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आज सकाळी ६ वाजता रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
आठ दिवस आंदोलन केल्यावर कोणीच दखल घेत नसल्याने निषेधार्थ पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध करण्यासाठी रिंगरोड व रेल्वे विरोधी आंदोलनातील कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी प्रांत कार्यालया समोरील पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलन सुरू केले. त्यांच्या या जीवघेण्या आंदोलनाने महसुल विभाग, पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ झाली . पोलीस अटकाव करतील म्हणून पाटीलबुवा गवारी हे पहाटे अंधारात येऊन टाकीवर चढुन बसले. सकाळ झाल्यावर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान,राजगुरूनगर शहरातील नागरिकांनी आंदोलन स्थळी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक निरीक्षक राहुल लाड , संदिप भापकर पोलीस या ठिकाणी उपस्थित होते. अनेक विनंत्या करून देखील पाटिलबुवा गवारी खाली आले नाही.
तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, च-होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांनी तीव्र विरोध केला असून खेड प्रांत कार्यालयासमोर गेली नऊ दिवसांपासून "ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण" सुरू आहे मात्र प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही.त्यामुळे समितीने आंदोलन तीव्र केले.
या आंदोलनामध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी शांतपणे बसून बैठक घेतली जाईल असे सांगितले . व पोलीस निरीक्षक यांनी पाटील बुवा गवारी यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन दिले त्यांना फक्त समज देऊन घरी सोडण्यात येईल. त्यांनतर प्रांत कार्यालयात पाटीलबुवा गवारी त्यांचे कुटुंब अनेक शेतकरी मंडळी , पोलीस निरीक्षक, पत्रकार यासमावेत बैठक झाली असून त्या बैठकीत सर्व शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणी थांबवावी अशी विनंती केली आहे . प्रांत अधिकाऱ्यांनी मोजणी थांबवली जाईल असे आश्वासन दिले आहे.
या आंदोलनदरम्यान पाटील बुवा गवारी व त्यांचे कुटुंब ,प्रांत अधिकारी , पोलीस निरीक्षक, शेतकरी बांधव क्राईम बॉर्डरची प्रतिनिधी ऋतुजा टाकळकर समावेत इतर पत्रकार इत्यादी लोक उपस्थित होते.
CRIME BORDER मुख्य संपादक : राजेंद्र वखरे, पुणे विभागीय प्रमुख : नितिन सैद