CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुबाडणारा चोरटा पोलीसांच्या जाळ्यात

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुबाडणारा चोरटा पोलीसांच्या जाळ्यात

पुणे (बाबाजी पवळे) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील नारायणगाव बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहण्याचा बहाणा करून बसची वाट पहात बसणाऱ्या प्रवाशांना एकटे असल्याचे पाहून तसेच प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्याला नारायणगाव पोलीसांनी काही तासातच शिताफीने अटक केली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार (दि.२ जुलै) रोजी प्रवासी निलेश जाधव (रा.हिंगोली) हे पहाटे १ च्या सुमारास आपल्या दोन साथीदारांसह नारायणगाव बस स्थानक येथे एसटीची वाट पहात बसले होते. त्यांच्या जवळ एक अज्ञात इसम येऊन,त्याने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील १६०० रुपये हिसकावून घेतले. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. फिर्याद येताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीसांनी एसटी बस स्थानक शिवारात आरोपीला पकडण्यासाठी सापळा लावला.

 

फिर्यादीने पोलीसांना सांगितलेल्या वर्णनावरून चाणाक्ष पोलीसांच्या नजरेने सावज हेरले.बसस्थानकाजवळील एका दुकानासमोर फिर्यादीने वर्णन केलेला आरोपी बसला होता. पोलीसांनी अलगद त्याला जाळ्यात पकडले.त्याला नाव विचारले असता, नितीन संजयजाधव(रा.आळकुटी,ता.पारनेर,जि. नगर)असे सांगितले. त्यास पोलीसांनी लागलीच अटक केली. त्याची झडती घेतली असता, त्याच्या जवळचे १६००/- रुपये रोख रक्कम पोलीस तपासात मिळून आली. आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

 

CRIME BORDER मुख्य संपादक : राजेंद्र वखरे,पुणे विभागीय प्रमुख : नितिन सैद