CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM
डोंबिवली (प्रधान कार्यालय) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या मानसेवी सह संपादक पदावर नुकतीच डोंबिवलीतील श्री . संतोष भोईर (सर ) यांची नियुक्ती मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी केली आहे.श्री. संतोष भोईर (सर ) हे क्राईम बॉर्डर परिवारामध्ये सन २०१० पासून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी क्राईम बॉर्डरच्या विविध पदावर उत्तम कार्य केले असून ते सन २०१५ पासून सह संपादक पदावर कार्यरत आहेत. त्यांची पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. संतोष भोईर (सर ) यांना शैक्षणिक,सामाजिक व अध्यात्मिक जनसेवेची विशेष आवड असून त्यांना क्राईम बॉर्डर व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ ) च्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे आहे .त्यांच्या या निवडीने आप्त मित्रपरिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
श्री. संतोष भोईर (सर ) उच्च शिक्षित असून यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तसेच पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्टला नक्कीच उपयोग होईल असे उद्गार मुख्य संपादक श्री .राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर करताना काढले.
श्री. संतोष भोईर (सर ) हे डोंबिवलीतील शिक्षण महर्षी श्री.नामदेवराव भोईर यांचे चिरंजीव असून ते सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूलचे ट्रस्टी आहेत.