CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉ.शशिकांत काळे यांची क्राईम बॉर्डर च्या नाशिक विभागीय संपादक पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

डॉ. शशिकांत काळे यांची क्राईम बॉर्डर च्या नाशिक विभागीय संपादक पदावर नियुक्ती जाहीर करतांना क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे
डॉ. शशिकांत काळे यांची क्राईम बॉर्डर च्या नाशिक विभागीय संपादक पदावर नियुक्ती जाहीर करतांना क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे

डोंबिवली (प्रधान कार्यालय) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या नाशिक विभागीय संपादक मानसेवी पदावर बेटावद बुद्रुक ता. जामनेर , जि .जळगाव येथील डॉ. शशिकांत काळे यांच्या पत्रकारिता, अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक श्री.राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.

डॉ. शशिकांत काळे हे गेल्या दहा वर्षापासून क्राईम बॉर्डर परिवारातील तालुका, जिल्हा व विविध विभागावर त्यांनी यापूर्वी कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची क्षमता ओळखून त्यांना नाशिक विभागीय संपादक पदावर मानसेवी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. शशिकांत काळे यांना पत्रकारिता ,आध्यात्मिक ,शैक्षणिक, सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त ,मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

त्यांचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी श्री.निलेश चौधरी व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी कु. प्राजक्ता चौधरी तसेच वरणगावच्या प्रतिनिधी सौ.नयना चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.