CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

चांडोलीत १५ लाखांचा अपहार प्रकरणी ग्रामसेवक विरोधात पोलीसात तक्रार दाखल

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:38 PM

चांडोलीत १५ लाखांचा अपहार प्रकरणी ग्रामसेवक विरोधात पोलीसात तक्रार दाखल

CRIME BORDER 

पुणे विभागीय प्रमुख नितिन सैद

खेड : खेड तालुक्यातील चांडोली ग्रामपंचायत मध्ये १५ लाखाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सरपंच सुनीता सावंत,उपसरपंच दत्तू वाघमारे व इतर सद्स्यांनी केला असून याबाबत खेड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

पदाधिकारी यांची निवड होऊन चार महीने झाले असून अगोदरच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी  संपल्यावर कोरोना मुळे निवडणूका लांबणीवर झाल्या.त्या मधील काळात ग्रामसेवक यांनी सुमारे २३ लाख रुपये घरपट्टी वसूल केली,पण खात्यामध्ये कमी रक्कम जमा केली गेली.व तीस ते चाळीस नवीन घरांच्या नोंदी केरुन नोंदी साठी लोकवर्गणी घेतली परंतु ग्रामपंचायत दप्तरी जमा केली नाही.

 

हे लक्षात आल्या नंतर सरपंच व इतर सदस्य यांनी दप्तर मागणी केली. परंतु ग्रामसेवक यांनी टाळा टाळ केली.अखेर सरपंच व इतर सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कड़े तक्रार केली असता त्यांनी ग्रामपंचायत चे दप्तर ताब्यात घेतले.

 

दप्तर देण्यास दिरंगाई केल्या मुळे सरपंच,उपसरपंच व इतर सदस्य यांनी पोलीसात तक्रार दाखल केली .यावर बोलतांना पोलीस निरीक्षक सतीषकुमार गुरव म्हणाले की, गटविकास अधिकारी यांच्या कड़े चौकशीचे पत्र दिले असून त्यांच्या अहवालानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामस्थांकडून कार्यवाही ची मागणी जोर धरु लागली आहे.

 

CRIME BORDER

मुख्य संपादक:राजेंद्र वखरे