CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM
डोंबिवली ( प्रधान कार्यालय ) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मानसेवी पदावर नवी मुंबई येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री .दशरथ नामदेव कोकणे यांच्या प्रदीर्घ सामाजिक ,आध्यात्मिक व पत्रकारिता कार्याची विशेष दखल घेऊन बॉर्डर चे मुख्य संपादक श्री .राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.
श्री. दशरथ नामदेव कोकणे यांना सामाजिक व जनसेवेच्या कार्याची विशेष आवड असून गोरगरिबांसाठी व क्राईम बॉर्डर तसेच पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे . त्यांच्या या निवडीने आप्त मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ज्येष्ठ समाजसेवक श्री. दशरथ नामदेव कोकणे यांच्या अनुभवाचा अन्यायग्रस्त व क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) ला नक्कीच उपयोग होईल असे उद्गार मुख्य संपादक श्री. राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर करताना काढले.