CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM
कार्यालय (प्रतिनिधी) : चला पेटवू या दिवे ,ज्याठिकाणी अजूनही अंधार आहे. हे ब्रिद घेऊन दि. १४ जून २०१३ पासून कार्यरत असलेल्या क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या प्रभारी जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले व क्राईम बॉर्डर चे जिल्हा प्रतिनिधी निलेश चौधरी यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख डॉ. शशिकांत काळे यांच्या विशेष शिफारशी वरून त्यांची समाजसेवी /मानसेवी प्रभारी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी जाहीर केली.
त्यांना सामाजिक , शैक्षणिक, आध्यात्मिक ,पत्रकारिता या कार्याची आवड असून त्यांना क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) माध्यमातून त्यांना समाजकार्य करायचे आहे.त्यांच्या या निवडीने मित्र परिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .