CRIME BORDER | 26 December 2025 | 04:39 PM
CRIME BORDER
राजगुरुनगरहून नितिन सैद
खेड : राजगुरुनगर नगरपरिषदेने महावितरण कंपनीचे विज बिल न भरल्या कारणाने आज दि .२१ जून २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजता विज कनेक्शन तोडलेचे सहायक अभियंता श्री.सावंत यांनी सांगितले.या मुळे आज राजगुरुनगर शहर पूर्ण अंधारात तर असणार आहेच या शिवाय पाणी पुरवठा सुद्धा बंद रहाणार आहे.दोन महिन्या पूर्वी महावितरणने अशीच कार्यवाही केली होती.त्यावेळी बिलाची काही रक्कम भरणा करून तातपुर्ती विज जोड़णी करून लाईट व पाणी पुरवठा सुरु केला होता.बिल भरण्यासाठी काही काळ मुदत घेऊन सुद्धा उर्वरित बिलाची रक्कम न भरल्या कारणाने आज पुन्हा महावितरण कंपनीने विज पुरवठा खंड़ित केला.
असल्याने पुन्हा एक वेळा नगरपरिषदेचा गलथान कारभार चव्हाटयावर अला असून जनतेमधे संताप निर्माण झाला.नगरपरिषद कार्यालयात माहिती घेतली असता परिषदेचे अधिकारी कामात टाळा टाळ करत असल्याचे जाणवले.
CRIME BORDER मुख्य संपादक:राजेंद्र वखरे, पुणे विभागीय प्रमुख नितिन सैद