CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM
डोंबिवली प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी पदावर वरणगाव येथील रहिवाशी निलेश प्रभाकर चौधरी यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी खान्देश विभाग प्रमुख डॉ. शशिकांत काळे यांच्या शिफारशीवरून सदर मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे. निलेश चौधरी गेल्या ५ वर्षांपासून क्राईम बॉर्डर चे सक्रिय मेंबर आहेत .
निलेश प्रभाकर चौधरी यांना सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना पत्रकारिता व सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.