CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली : राजगुरुनगर जि.पुणे येथे स्थायिक असलेले व क्राईम बॉर्डर परिवारात गेल्या ७ वर्षापासून कार्यरत असलेले वरिष्ठ समाजसेवक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच अनेक पुरस्कार प्राप्त श्री.नितीन सैद यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांची क्राईम बॉर्डर चे संस्थापक राजेंद्र वखरे यांनी श्री.नितिन सैद यांची क्राईम बॉर्डर,परिवारासाठी घेत असलेली मेहनत तसेच पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट,कल्याण च्या माध्यमातून ते करीत असलेली समाजसेवा, तसेच क्राईम बॉर्डर चे वर्षभरातील आयोजित असलेले सामाजिक उपक्रम यामध्ये त्यांचा हिरीरीने असलेला सहभाग तसेच त्यांचे संघटन कौशल्य या सर्व बाबींचा विचार करून त्यांची पुणे विभागीय मानसेवी संपादक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती पत्र व ओळखपत्र क्राईम बॉर्डर चे मुख्य कार्यालय डोंबिवली येथे संस्थापक राजेंद्र वखरे हस्ते प्रदान करण्यात आले असून त्यांना या विभागात क्राईम बॉर्डर साठी जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी तसेच शहर प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीने मित्रपरिवारात आनंद पसरला असून त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.त्यांना क्राईम बॉर्डर परिवारातर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.