CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

लोणावळ्यातील बालरोग तज्ञ डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा पन्नास लाख रोख व दागिने लंपास

CRIME BORDER | 26 December 2025 | 05:03 PM

लोणावळ्यातील बालरोग तज्ञ डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा पन्नास लाख रोख व दागिने  लंपास

CRIME BORDER 

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे

लोणावळा (श्रावणी कामत) : लोणावळ्यातील बालरोग तज्ञ डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा पन्नास लाख रोख व दागिने एकूण अंदाजे ६६,७७,५००/- (सहासष्ट लाख सत्यात्तर हजार पाचशे रुपये) चा मुद्देमाल लंपास.

 

लोणावळा दि.१७ जून २०२१ रोजी : २० ते २५ वर्ष वयोगटातील ५ ते ६ अनोळखी शस्त्रधारी इसमांनी लोणावळ्यातील सुप्रसिद्ध डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (बालरोग तज्ञ ) यांच्या प्रधानपार्क, खंडेलवाल हॉस्पिटल येथील राहत्या बंगल्यात जबरदस्तीने घुसून शस्त्राचा धाक दाखवून ६६,७७,५००/- रोख रक्कम व ऐवज लंपास केल्याची घटना दि.१७ जून  रोजी पहाटे १ ते ३ वाजेच्याच्या सुमारास घडली.

 

 

लोणावळा पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार २० ते २५ वयोगटातील ५ ते ६ अनोळखी इसम डॉ. खंडेलवाल यांच्या राहत्या बंगल्यात खिडकीद्वारे जबरदस्तीने आत घुसले त्यावेळी डॉक्टर व त्यांची पत्नी हे त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असतांना सदर आरोपींनी त्या दोघांचे हात पाय सुताच्या दोरीने बांधले आणि धारदार चाकूचा धाक दाखवून धमकी देऊन बंगल्यातील  ५०,००,०००/- अंदाजे रोख रक्कम त्यामध्ये २,००० रु दराच्या १,५०० नोटा व ५०० रू दराच्या ४,००० नोटा अशी रोख रक्कम व अंदाजे १० तोळे वजनाचे पाच नेकलेस,१,४७,०००/– अंदाजे ३ तोळे वजनाचा एक लॉग सोन्याचे गंठन,१,९६,०००/ – अंदाजे ४ तोळे वजनाच्या ४ सोन्याच्या बांगडया, १,४७,०००/ – अंदाजे ३ तोळे वजनाच्या 4 सोन्याच्या बांगडया, ५५,०००/– १ सोन्याची चैन त्यास पाच ठिकाणी डायमंडच्या फुलांची डिझाईन केलेली ,  १,००,०००/-  १ व्हाईट गोल्ड (सोने) चैन त्यास तीन बारीक पदर असलेले त्यावर डायमंडचे नक्षीकाम केलेले ३.२०,०००/– ४ डायमंड धातुच्या अंगठया, १,००,०००/- – २ डायमंड धातुच्या बांगडया, १,२२,५००/– देव घरातील देवाच्या प्रत्येकी १ तोळे वजनाच्या २ सोन्याच्या अंगठया व अर्धा तोळे वजनाची एक सोन्याची चैन असा ऐवज ६६,७७,५००/-रुपये येणे प्रमाणे वरील वर्णनाचा माल राहत असलेल्या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बंगल्यामधून लंपास करण्यात आला आहे.

 

डॉ. खंडेलवाल यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती नुसार आरोपी अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील असून त्यांच्या पायात स्पोर्ट शुज, अंगात पॅन्ट शर्ट असा पेहनावा आणि सडपात्तळ, उंच बांधा असलेले हिंदी भाषेतुन बोलणारे असे आरोपींचे वर्णन असून त्या पाच ते सहा शस्त्रधारी इसमांनी घरातील एकूण ६६,७७,५००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरून नेला आहे.

 

त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं.६० /२०२२ भा. द  वि .कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करित आहे.