CRIME BORDER | 26 December 2025 | 05:04 PM
राजगुरूनगर (ऋतुजा टाकळकर) : शेतात विजेची तर तुटून पडल्यामुळे वीज वाहक तारेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मुत्यू झाला आहे. या शेतकऱ्या नाव दामु नामदेव गोपाळे ( वय- ८२ वर्षे , रा. साबुर्डी ता खेड) असे आहे. हि घटना दि २२ सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमाराम घडली. गोपाळे यांचा मुलगा शरद दामू गोपाळे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.जनावरांच्या गोठयाकडे जात असताना शेतात तुटून पडलेल्या वीज वाहक तारेवर पाय पडल्यामुळे जोरदार शॉक बसला.
साबुर्डी येथे गोपाळे यांच्या शेतातुन विजेचे खांब गेले आहेत. काही दिवसांपूर्वी या पोलवरील एक वीज वाहक तार तुटून शेतात पडली होती. आज सकाळी शेतात गोपाळे यांचा मुलगा पेरणी करत होता. दरम्यान दामु गोपाळे हे शेतातून फावडी घेऊन जनावरांच्या गोठयाकडे जात होते. तेव्हा शेतात तुटून पडलेल्या वीज वाहक तारेवर पाय पडल्यामुळे वीजेचा जोरदार शॉक बसून दामू गोपाळे यांचा जागीच मूत्यू झाला आहे. सदर दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत्र आहे .
CRIME BORDER मुख्य संपादक:राजेंद्र वखरे, पुणे विभागीय प्रमुख नितिन सैद