CRIME BORDER | 27 December 2025 | 07:06 PM
डोंबिवली : राजेंद्र वखरे
डोंबिवली : महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे , जळगाव जिल्हा अध्यक्ष तरुण, तडफदार युवा नेतृत्व रविंद्र ( बंटी) नेरपगारे म्हणजे उदोयोन्मुख नेते बंटी भाऊ म्हणजे आजच्या घडीला नाभिक समाजातील युवकांच्या गळ्यातील ताईत म्हटल्यास वावगे ठरू नये . ते अतिशय नम्र ,शांत ,संयमी असून त्यांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय विषयाचा उत्तम ,गाढा अभ्यास आहे .त्यांनी जळगाव जिल्ह्याला "एक नवी दिशा व नवी आशा" दिली आहे.
अल्पावधीतच त्यांनी तळागाळातील तसेच शिक्षित-अशिक्षित समाजाला एकत्र करण्याचे काम हाती घेतले .आहे नुकताच त्यांनी चाळीसगाव येथे मोठा मेळावा आयोजित केला होता. यासाठी चाळीसगाव कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले होते. या मेळाव्याला मा.कल्याणजी दळे साहेब यांनी व समाजातील जाणकारांनी अनमोल मार्गदर्शन केले होते.
"नाभिक जिल्हाध्यक्ष नाभिक समाजाच्या दारी" हा उपक्रम त्यांनी राबवला ते नवख्या तरुणांना या प्रवाहात आणत आहेत,प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी जळगाव जिल्हा पिंजून काढून नाभिक समाजाच्या काय समस्या आहेत हे जाणून घेतले अशा या हरहुन्नरी तसेच समाजाप्रती स्वतःला झोकून दिलेल्या युवा नेतृत्वास नाभिक समाजा तर्फे तसेच साप्ताहिक महाराष्ट्र नाभिक त्याचबरोबर पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे "क्राईम बॉर्डर" व सामाजिक पत्रकार संघटना "क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन" तसेच साप्ताहिक कल्याण-डोंबिवली व्हिजन, पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट , डोंबिवली व संजय वाघ सर व मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
रविंद्र उर्फ बंटी नेरपगारे भाऊ तुमचा संघर्षमय जीवन प्रवास आमच्यासाठी एक नवा आदर्श आहे तुमचे उत्तम विचार आमच्यासाठी एक नवे मार्गदर्शक आहेत. तुमचा पुढील जीवन प्रवास सुखमय होवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना!
तुमचा मित्र: राजेंद्र वखरे ,डोंबिवली