CRIME BORDER | 26 December 2025 | 05:05 PM
लोणावळा ,दि २३,(सौ.चित्रा कामत ) : लोणावळ्यातील भाजपा कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सत्तावीस जणांविरुद्ध लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोणावळा शिवाजी चौक येथे भाजपाच्या वतीने आघाडी सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनास कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना जमाव बंदीचे आदेश डावलून हे आंदोलन करण्यात आले आहे.
या संदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.हवालदार पंढरीनाथ भिकु कामठे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेखा जाधव(नगराध्यक्षा लो.न.पा.),रामविलास खंडेलवाल( शहराध्यक्ष),श्रीधर पुजारी(उपनगराध्यक्ष),मंदा सोनवणे(नगरसेविका),बिंद्रा गणात्रा(नगरसेविका),रचना सिनकर,सुनील तावरे,अनिल खिलारे,राजू खळदकर,जितेंद्र बोत्रे,देविदास कडू,विजय सिनकर,नंदू जोशी,ललिता सिसोदिया,दिलीप गुप्ता,पारख,सचिन ढोकरीया,हेमंत कांबळे,नवीन भुरट,सुनील म्हस्के,गिरीष मुथा,कमलेश,योगिता कोकरे,सायली बोत्रे ,सुजाता मेहता,शुभांगी जाधव,परीजा भिलारे सर्व राहणार लोणावळा नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी दि. २२ रोजी सकाळी लोणावळा शिवाजी चौक येथील सार्वजनिक रोडवर जमाव एकत्र करून आघाडी सरकार विरोधात हातात झेंडे घेऊन काळी फीत लावून नारेबाजी करत आंदोलन केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.३३१/२०२२० भा.द.वि.कलम ३४१,१८८,२६९,२७० सह साथीरोग नियंत्रण कायदा १८९७ चे कलम ३,महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी पुणे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पारित केलेला आदेश क्र.जि. आ.व्य./कावी/५९८/२०२० पुणे दि.२०/०४/२०२० अन्वये शासनाने दिलेल्या निर्देशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याची जाणीव असताना तो पसरविण्याची कृती करून जिल्हाधिकारी पुणे व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ यांना रवाना केला आहे. सदर गुन्हा पोलीस नाईक बुये यांनी दाखल करून घेतला व पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.अमोल कसबेकर हे करत आहेत.