CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

लता दीदी ..

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:10 PM

No image available

क्राईम बॉर्डर साहित्यिक कॉर्नर

रविवार म्हणून आज उशिराच उठणं झालं आणि उठल्या उठल्या लता दीदी गेल्याची दुःखद बातमी ऐकली. ऐकताच क्षणी मन भरून आलं अगदी आपल्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती गेल्याची जाणीव झाली. शाळेत असताना दीदींचा एक धडा अभ्यासक्रमात होता त्या धड्यापासून दीदींची ओळख झाली. किती खस्ता खाऊन त्यांनी भावंडांचा सांभाळ केला, आपल्यातील गायनाच्या कलेला कसा वाव दिला अन एक उज्जवल व्यक्तिमहत्व घडवलं ह्याच दर्शन घडवणारा तो धडा होता.

माझं शालेय शिक्षण कोकणातल्या एका खेडेगावात झालं. त्यावेळी टीव्ही फार क्वचित घरांमध्ये असायचा. त्यामुळे आजच्या इतकी बाहेरील जगाची माहिती त्यावेळी आमच्या पिढीला नव्हती. आमच्या घरी रेडिओ होता आणि त्यावर लता दीदींची गाणी लागायची. त्यावेळी त्याचा अर्थ काही कळत नसे पण आवाज मात्र ऐकत राहावंसं वाटे. पुढे आवडता गायक गायिका निबंध आला कि हमखास दीदींबद्दल लिहिणं ठरलेलं असायचं. कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही पण अगदी आठवी नववी पर्यंत मला असेच वाटे कि सगळी गाणी लता दीदीच गातात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणा गायकाचं नाव तेव्हापर्यंत तरी मला ठाऊकच नव्हतं. पुढे त्यांचं मी रात टाकली, मी कात टाकली.....हे गाणं ऐकलं आणि का कोण जाणे पण आजतगायत ते गाणं मला दीदींच्या आयुष्यच चित्र रेखाटणारच वाटलं. आजही ते गाणं सहज कानावर पडत

मी रात टाकली, मी कात टाकली

मी मुडक्या संसाराची बाई लाज राखली

अन आजही त्या ओळींचा अर्थ दीदींच्या जीवनपटाशी तंतोतंत जुळतो. एक स्त्री एकट्यानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी इतक्या लहान वयात किती सचोटीने सांभाळू शकते ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे लता दीदी. दिवसरात्र एक करून त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. आपल्या बरोबरीने आपल्या भावंडांच देखील भवितव्य उज्जवल केलं. खाचखळग्यातून मार्ग काढून यशाच्या उतुंग शिखरापर्यंत पोहचणं हा जीवनप्रवास म्हणजेच दीदींचं संपूर्ण आयुष्य.अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवलेल असं लाडकं व्यक्तिमहत्व आज अनंतात वीलिन झालं. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईशवरचरणी प्रार्थना.

©®स्नेहा शिंदे.

मुख्य संपादक:राजेंद्र वखरे, डोंबिवली

आपले उत्कृष्ट साहित्य व कविता पाठविण्यासाठी

संपर्क 9619630035