CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

सोनगीरी गावात सरपंच प्रदीप पाटील यांनी स्वखर्चाने आणले पाणी

CRIME BORDER | 26 December | 11:40 AM

क्राईम बाॅर्डर प्रतिनिधी  गजानन रावळकर

डोंबिवली : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात असलेल्या सोनगीरी गावात गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित असलेला  पिण्याच्या प्रश्न सुटल्याने गावात आनंद व्यक्त होत आहे. 

 

सोनगीरी ते आडा यातील अंतर सात किलोमीटरचे असून प्रदीप पाटील यांनी आडा येथील धरणांतून स्वखर्चाने पाईप लाईन टाकून सोनगीरी गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला.प्रदीप पाटील हे गावचे नवतरुण सरपंच आहेत गावातील तरुणासाठी जीम बांधून देण्याचे काम सुद्धा त्यानी नुकतेच हाती घेतले आहे. यांच्याशी संपर्क साधला असता गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच या नात्याने मी सर्वोतपरी प्रयत्न करून गावचा विकास करेल असे त्यांनी सांगितले.त्यांच्या या कार्याचे सर्व गावकऱ्यातून अभिनंदन होत आहे.