CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

स्मशान भूमीत प्रेत एकटेच

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:21 PM

No image available

स्मशान भूमीत प्रेत एकटेच जळत होते....ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....

हेच ते प्रेत जिवंत असताना माझे माझे करत असेल, एक एक रुपया साठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरी ही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..

जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशान भूमी पर्यंतच सोबती झाले-खरे ; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चार घास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्ती पैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशान भूमीतील एकाकी घाटावर, अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा बरोबर नव्हती.

जळताना - ना प्रेम करणारे जिवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे, ना करोडोची संपत्ती. अरे अरे.... तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टीचा मोह धरून पळत राहिला.... ही खंत तर नसेल वाटत त्या जळणा-या प्रेताला...

सज्जन हो !
आत्मप्रौढी, स्वतःचा मोठेपणा, दुस-याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहंपणाचा महामेरू ही जीवनातील -हासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही.

जीवन सुंदर बनविण्यासाठी काम- क्रोध-लोभ- मत्सररूपी लक्षणांना दूर ठेऊन जीवनात किती ही मोठेपद, प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेऊ या....

माणूस बनू या .........पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट, कल्याण . !! 9619630035