CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

सरपंच श्रीमती.गयाबाई जोगदंडे यांनी क्वारंटाईन केलेल्या कामगारांची केली व्यवस्था

CRIME BORDER | 26 December | 11:44 AM

जालना:(क्राईम बाॅर्डर-प्रतिनिधी-अंकुश जोगदंड):जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या जानेफळ (दाभाडी) येथील अकरा रहिवासी कुटुंब हे अहमदनगर व पुणे जिल्ह्यात पाच सहा महिन्यांपूर्वी उस तोडणीच्या कामासाठी गेले होते. सदरील कुटुंब हे साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यावर दि. ३ मे २०२० रोजी आपल्या मुळ गावी परतल्यावर आरोग्य विभागाने त्यांना क्वारंटाईन करुन १४ दिवस  गावापासून अंतरावर ठेवण्यास सांगितले . 


गावच्या सरपंच श्रीमती.गयाबाई जोगदंडे यांनी आपल्या शेतात या सर्व कुटुंबाची राहण्याची व्यवस्था  करुन  पन्नास किलो शिधा तसेच विहीरीवरती पाण्याची व्यवस्था करुन दिली.तसेच जानेफळ दाभाडी येथील रहिवासी व समाज सेवक सदाशिवराव मिसाळ  (नाना) यांनीही तंदूळ  व किराणा माल देऊन माणुसकी जपली.यावेळी सर्व कामगारांनी गावच्या सरपंच श्रीमती गयाबाई जोगदंडे व सदाशिवराव मिसाळ यांचे मनापासून आभार मानले