CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

भुसावळमध्ये गोळीबाराचा कहर ! नागरिकांमध्ये भीती, कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

CRIME BORDER | 27 December | 01:54 PM

सुरेश कोळी : भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी

भुसावळ:संपूर्ण महाराष्ट्रात जंक्शन म्हणून ओळख असलेले भुसावळ शहर बनत आहे गुन्हेगारीचा अड्डा.भुसावळहून जळगाव कडे जाणाऱ्या खडकवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाजवळ एक पान टपरी आहे. या टपरीच्या आडोशाला उल्हास गणेश पाटील हे फोनवर बोलत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघां संशयितांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाटील यांच्याकडील रोकड हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांनी विरोध केल्याने संशयितांपैकी एकाने सोबत असलेल्या देशी गावठी कट्ट्यातून गोळी झाडली.ही गोळी उल्हास पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारवळ्यात जमिनीवर कोसळले.गोळीबारानंतर परिसरात घबराट पसरली आणि नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली.घटनेनंतर चौघेही आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.गोळीचा आवाज ऐकतास परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील पाटील यांना प्रथम भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले तसेच घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते ,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे तसेच जळगाव गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले,

तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट येऊन पाहणी केली व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले तसेच प्रत्यक्ष दर्शी यांचे जबाब नोंदवण्यात आले. गुप्त खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागात शोध मोहीम राबवली .

या कारवाई तीन संशयतांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले असून चौथा संशयित आरोपी अद्याप करार आहे. त्याबाबत ताब्यात घेतलेले संशयित आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्याबाबत अधिकृत पृष्टी तपासानंतर होईल . तिन्ही संशयित आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जळगाव बाल सुधार गृहात पाठविण्याचे आदेश दिले.