CRIME BORDER | 27 December | 01:54 PM
डोंबिवली : (राजेंद्र वखरे ) : जुन्या भांडणाचा राग मनात साचत गेला… सूडाची संधी मिळताच २९ वर्षीय इसमासह अल्पवयीन तरुण व तरुणींनी थरारक कृत्याला अंजाम दिला. कोणताहीविचार न करता, परिणामांची पर्वा न करता आरोपींनी एका व्यक्तीवर चाकू, लोखंडी रॉड व कोयत्याने अक्षरशः तुटून पडत तब्बल ४० वार केले आणि त्याचा जागीच निर्घृण खून केला.घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मात्र गुन्हेगारांना मोकळे सोडण्याऐवजी रामनगर, डोंबिवली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सर्व आरोपींना ताब्यात घेत चतुर्भुज केले.अल्पवयीन वयात हातून घडलेला हा गंभीर गुन्हा समाजासाठी गंभीर इशारा ठरत असून, क्षणिक राग कसा आयुष्यभराचा पश्चात्ताप ठरतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. रामनगर पोलिसांच्या जलद आणि कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आर. के. इंटरप्राईजेस कोपर स्टेशन जवळ डोंबिवली पूर्व येथे संशयित आरोपींनी आपसात संगणमत करून जुन्या भांडणाच्या कारणावरून नरेंद्र उर्फ काल्या जाधव याला " तू यहा क्यू आया यहांसे तुमको जाने नही देंगे तुझे यही खतम कर देंगे देखते है तुमको कौन बचाने आता है" असे बोलून शिवी गाळी ,दमदाटी करून चाकू, कोयता आणि लोखंडी रॉडने त्याचे डोक्यावर ,मानेवर, गळ्यावर ,छातीवर, पोटावर, पाठीवर, हातापायावर असे एकूण ४० वार करून त्यास जीवे ठार मारले तसेच त्याला वाचवण्यासाठी फिर्यादी हे मध्ये गेले असता आकाश बिराजदार याने त्यांना शिवीगाळी करून "तू बीच मे आया तो तुझे खतम कर देंगे" अशी दमदाटी करून त्याचे डोक्यावर चाकूचे वार करून व इतरांनी हाता बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्याप्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे १) आकाश बिराजदार २) गुप्ता पूर्ण नाव माहित नाही ,एक अनोळखी इसम आणि एक अनोळखी महिला यांचे शोध घेणे कामी पोलिसांचे तात्काळ तपास पथक तयार करून आरोपींचा शोध व योग्य तपास करणे बाबत पोलीस आयुक्त परिमंडळ - ३ कल्याण व सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांनी सूचना दिल्या. त्याप्रमाणे एका पथकाने घटनास्थळा लगत असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली त्या दरम्यान दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी नामे आकाश बिराजदार हा घटनास्थळ जवळच राहत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेणे कामी सदर ठिकाणी धाव घेतली सदर ठिकाणी आरोपी राहत असून त्यांचे घरास लॉक होते .
आजूबाजूस राहणाऱ्या लोकांकडे विचारपूस करता त्यांना संशयित आरोपीं बाबत काही एक माहित नसल्याचे सांगितले सदर आरोपी यांच्याकडे मोबाईल नसल्याचे देखील सांगितले. सदर तपासात आरोपी याची पत्नी व दाखल गुन्ह्यातील त्याचा साथीदार यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त झाले . सदर मोबाईलचे अनुषंगाने आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी महिला ही अंबरनाथ येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तपास पथक व महिला अंमलदार असे सदर ठिकाणी रवाना झाले. सदर ठिकाणी तपासात संशयित आरोपी महिला मिळून आली असून तिचे कडे मुख्य आरोपी संशयित नामे आकाश बिराजदार याचे बाबत विचारपूस करता तिने काही एक उपयुक्त माहिती दिली नाही परंतु तो त्याचे आईच्या घरी उल्हासनगर - ३ येथे असण्याची शक्यता होती म्हणून प्राप्त माहितीचे आधारे दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी आकाश बिराजदार याचे आईचे घरी शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही तसेच सदर ठिकाणी प्राप्त मोबाईल क्रमांकाचे आधारे तांत्रिक तपासात संशयित आरोपी व त्याचा साथीदार हे दिवा वेस्ट येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने दिवा वेस्ट येथे त्यांचा शोध घेतला असता सदर ठिकाणी गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार व २९ वर्षे व त्याचा साथीदार नामे दिवाकर महेशचंद्र गुप्ता वय १८ वर्षे ,आलीफ शहादाब खान वय १८ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे
दाखल गुन्ह्याचे तपासात मुख्य संशयित आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार याने फिर्यादी व दाखल गुन्ह्यातील मयत इसम नरेंद्र जाधव यांचे पूर्व वैमानस्यातून कोयत्याने ,चाकूने मयताचे शरीरावर ४० वार करून नरेंद्र उर्फ काल्या भाई रामचंद्र जाधव वय ३७ वर्षे यास ठार मारले तसेच फिर्यादी शुभम राजेश पांडे वय २७ वर्षे यास गंभीर जखमी केले दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदर गुन्ह्या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे ,सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण ,अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव ,पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 3 कल्याण अतुल झेंडे ,सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. निरी.गणेश जवादवाड , पो. निरी. (गुन्हे ) राजेंद्र खेडेकर ,गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. उप. निरी. प्रसाद चव्हाण, पो. हवा. सुनील भणगे ,पो. हवा. देविदास चौधरी, पो. शि. शिवाजी राठोड ,पो. शि. निलेश पाटील,पो. शि. ज्ञानेश्वर शिंदे ,पो. शि. राजेंद्र सोनवणे ,पो. शि. सचिन वरठा , महिला पो. अंमलदार वेणू कळसे व
सदर गुन्ह्याचे तपासात मदत करणारे अधिकारी व अंमलदार सहायक पो. निरी. ईश्वर कोकरे ,स. पो. निरी. शहाजी नरळे,स.पो.निरी. प्रवीण घुटुकडे ,स.पो.निरी. पाटणे, पो.हवा. महेंद्र धुमाळ, पो. हवा. निसार पिंजारी ,पो.अंमलदार जयपाल मोरे ,पो.अंमलदार अजय बागुल ,पो. हवा.सुभाष भांबळे, पो.अंमलदार दीपक ननावरे व शेखर कदम यांनी परिश्रम घेतले