CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

१० वर्षीय बालकेवर अत्याचार : नाभिक बहुउद्देशीय मंडळातर्फे पाचोरा येथे तीव्र निषेध

CRIME BORDER | 27 December | 01:54 PM

पाचोरा : सटाणा तालुक्यात एका नऊ वर्षाच्या निरागस बालिकेवर ७० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे . सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पाचोरा येथील श्री संत सेना नाभिक समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे सदर इसमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय बनसोडे ,पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना देण्यात आले.

सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली

निवेदन देतांना पाचोरा नाभिक समाज अध्यक्ष रमेश चुडामण जाधव व सचिव विकास शिरसागर, कृष्णराव वाघ, प्रदीप गायकवाड, प्रमोद सन्नांसे, भगवान बिडकर सर ,मोहित जाधव ,कैलास अहिरे, ,रतन अहिरे, संदीप अहिरे, जगन्नाथ सोनवणे, राहुल जाधव ,गणेश जगताप, योगेश न्हावी, सोपान सोनवणे ,राजेश वखरे ,शंकर पवार ,सुनील अहिरे, ज्ञानेश्वर वाघ ,वाल्मीक वाघ, किशोर सोनवणे, संदीप सोनवणे सर, गणेश जगताप, नारायण महाले, लखन जगताप, किरण श्रीवास, संतोष महाले, प्रकाश मानकरे, हर्षल जाधव व सौ शोभा जाधव तसेच सर्व नाभिक समाज बांधव पाचोरा शहर ग्रामीण हजर होते.