CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नैराश्यातून प्रौढाने उचलले टोकाचे पाऊल

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

प्रतिनिधी निलेश चौधरी

जळगांव - येथील वाघ नगर परिसरात जिजाऊ नगरातील ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली . रविवार १ जानेवारी २२३ रोजी दुपारी १ वाजता घडली . याप्रकरणी जळगांव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .राजेश बन्सीलाल फुलपगारे ( वय - ४३ ) रा . जिजाऊ नगर, वाघ नगर, जळगांव मृत व्यक्तीचे नाव आहे.

राजेश बन्सीलाल फुलपगारे हे वाघ नगरातील जिजाऊ नगरात एकटेच राहत होते . शहरातील विवेकांनद प्रतिष्ठान यांच्या मुकबधिर विद्यालयात ते शिक्षक होते . गेल्या सहा महिन्यापासून त्यांची पत्नी मालेगांव येथे राहत होत्या. शेजाऱ्यांना घर बंद असल्यांची शंका आली . राजेश फुलपगारे हे घरातून बाहेर येत नाही . त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता राजेश यांनी आतून दरवाजा बंद करून गळफास घेतल्याने लक्षात आले .

या घटनेची माहिती जळगांव तालुका पोलीस स्टेशनला देण्यात आली . माहिती मिळताच पो . उप. निरी. नजन पाटील , पो. कॉ . अनिल फेगडे यांनी धाव घेवून पंचनामा केला . त्यांनी आत्महत्या का केली याचा पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.