CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Crime : आधी काका नंतर आजोबा मग वडिलांचा सख्या मुलीवर ४ वर्षांपासून अत्याचार- पवित्र नात्याला काळीमा

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

पुणे : पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर सुरवातीला तिच्या काकाने , नंतर तिच्या आजोबाने गेल्या चार वर्षांपासून अत्याचार केला. ही बाब तिने आपल्या वडिलांना सांगितली तर वाडिलांनी देखील तिच्यावर गेल्या वर्षभरापासून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.सदर मुलीच्या कॉलेजमध्ये सुरू असलेल्या समुपदेशांनात मुलीचा बांध फुटला आणि तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती समुपदेशकाला सांगितली.असून पोलिसांनी या नराधम बापाला बेडया ठोकल्या आहे.

मुळची उत्तर प्रदेशातील असलेली मुलगी पुण्यात तिच्या वडिलांकडे वर्षभरापूर्वीच आली. अतिशय हुशार असलेल्या या मुलीच्या शाळेत समुपदेशनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी या मुलीला विचारणा केली असता तिचा अश्रूंचा बांध फुटला. यावेळी समुपदेशकांनी तिला नेमके काय झाले असे विचारल्यावर तिने तिच्यावर झालेल्या आत्याचाराची कहाणी तिने कथन केली. पीडित मुलगी ही पुण्यातील एका कॉलेजमध्ये बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे.पीडित मुलीचे आई वडिल पुण्यात मोलमजुरी करुन राहतात. घरची परिस्थिती चांगली नसल्याने तिच्या आई वाडिलांनी तिला तिच्या उत्तर प्रदेशातील मुळ गावी राहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात पीडिता ही १२ वर्षाची असताना मुळगावी तिच्या ३३ वर्षाच्या काकाने तिला दमदाटी करुन तब्बल वर्षभर तिच्यावर बलात्कार करून तिच्या शरीराचे लचके तोडले .

७० वर्षाच्या तिच्या आजोबाने देखील तिच्याशी शारीरिक जवळीक निर्माण करून तीचा वारंवार विनयभंग केला. हा सर्व प्रकार सहन न झाल्याने तिने २०१८ मध्ये ती पुण्यात आईवडिलांकडे आली. तेव्हा पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या आत्याचाराची कहाणी तिच्या वडिलांना पत्र लिहून सांगितली. मात्र, आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्या ऐवजी तिचा बापच तिच्यावर अत्याचार करू लागला . तिची आई घरी नसतांना वाडिलांनी मुलगी आणि बाप या नात्याला काळिमा फासून तिच्यावर अत्याचार करू लागला .

दि. ५ नोव्हेबरला पीडितेच्या आईला बाहेर पाठवून नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर बलात्कार केला. तब्बल ४ वर्ष ती हा अत्याचार सहन करत होती. दरम्यान कॉलेजमधील कार्यक्रमात समुपदेशकापुढे तिच्या सहन शक्तीचा अंत झाला आणि तिच्यावर झालेल्या सर्व अत्याचार तिने समुपदेशकाला सांगितला. यानंतर या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.